पालकांनी साधावा आपल्या मूला मुलींशी संवाद……

पालकांनी साधावा आपल्या मूला मुलींशी संवाद……                       

                                                  श्रीमती नीलिमा ताई पवार

                                      (सरचिटणीस, मविप्र समाज,संस्था नाशिक)

           आज धावपळीच्या युगात आपल्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकांकडे वेळ नाहीये परंतु पालकांना आपल्या कर्तव्याची वेळेतच ओळख होऊन त्यांनी आपल्या मुलांशी संवाद साधन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस श्रीमती नीलिमा ताई पवार यांनी केले त्या मविप्र च्या दिंडोरी महाविद्यालयात आयोजित “पालक मेळाव्यात” अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. मुलींना देखील मुलांसारखं वागवलं पाहिजे.मुलींनी आत्मनिर्भर होऊन आलेल्या संकटाना समोर जायचं आहे     अत्यत चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात करून गुणवत्ता  प्राप्त करावी असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित दत्तात्रेय दादा पाटील यांनी उपस्थित पालकांना संबोधित करताना या नूतन महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतर अनेक समस्या होत्या. या सगळ्यावर मात करीत महाविद्यालयाने यशस्वी वाटचाल केली आहे. नव्याने सुरू केलेल्या बस सुविधा सुरू केली आहे त्याचा सर्व विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा सर्व पालकांनी ही या बाबतीत मुलांना मदत करून सहकार्य करावे अस आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालयात गत वर्षी व या शैक्षणिक वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा  घेतला व पुढील वर्षात होणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली . व पालक संघाची घोषणा करून उपस्थित पालकाचे स्वागत व सत्कार केला. पालक मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर अनिल दादा देशमुख विश्वासराव देशमुखतौसिफ मणियार डॉ डी एन शिंदेडॉ जे डी पवारप्रा देशमुख पालक संघाचे माधव वामन सपकाळमिराताई सपकाळ ,मंदाकिनी परशराम पाटील ,मनीषा पाटील,चंद्रकांत गांगुर्डेचंद्रभान अपसुंदेराजाराम पगार अनिता सतीश जाधव  आकाश जाधव संदीप गाडे नितीन खाडे यासर्व पदाधिकारीसह सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बलराम कांबळे यांनी केले तर  आभार प्रदर्शन डॉ दिनेश उकिर्डे यांनी केले कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते