आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्दमहत्त्वाची

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द महत्त्वाची..

                                                                                     –  श्री रोहन पवार 

                 मविप्र समाजाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिंडोरी येथे करिअर गायडन्स व  मार्गदर्शन याविषयावर चर्चा सत्र  आयोजित करण्यात आले होते  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रोहन पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की ग्रामीण भागातील  विद्यार्थी  हुशार व मेहनती आहे परंतु योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी न मिळाल्यामुळे विद्यार्थी मागे पडतात .आजच्या स्पर्धेच्या युगात  यशस्वी करिअर घडवण्यासाठी शिक्षणदृष्टिकोनकौशल्येसवयीकुवत हे सारे घटक महत्वाचे असतात.  करिअरची दिशा न ठरवताकशात जास्त संधी आहेतअसा विचार न करताआपली आवड व कुवतीनुसार करिअर निवडलेतर त्यात यशस्वी होता येईल.   करिअरमध्ये कौशल्य प्राप्त करून शिखर गाठायचेकी साधारण अनुभव घेऊन शेवटी राहायचेहे ठरवा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि जिद्द महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन श्री रोहन पवार  यांनी  केले.

                महाविद्यालयाच्या  प्राचार्या  डॉ वेदश्री थिगळे  यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि,आपण आज घेतलेल्या निर्णयावर भविष्यातील गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे योग्य कोर्स निवडणे हे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असतेत्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम ध्येयनिश्चिती करावी असे सांगितले.

               या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित राहून  करिअरच्या दृष्टीने असणाऱ्या  महत्वाच्या  प्रश्नांची उत्तरे  श्री रोहन पवार यांचेकडून माहित करून घेतली .

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन  करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा आर. आर. झोमन  यांनी  केले.

          कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  प्रा श्रीमती पी.एस कड व  प्रा श्रीमती .पी. जे गारे यांनी  केले. प्रा पी.के. पानपाटील यांनी आभार मानले.

Carrier Counseling 2019-20