छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य,पराक्रम, विचार,आजही प्रेरणादायी आहेत…

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य,पराक्रम, विचार,आजही प्रेरणादायी आहेत…                     

                       प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे

           साडेतीनशे वर्षा पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेला विचार हा त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीत हे सतीचे वाण हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो .मध्ययुगीन राजवटीत सुलतानाच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची परंतु शिवाजी महाराजांनी या सुलतान शाहीला न जुमानता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .स्वतःच्या पराक्रमानेशौर्याने,धाडसाने आणि जिद्दीने मूठभर मावळ्यांच्या मदतीने महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. याचे कारण म्हणजे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम म्हणूनच छत्रपतींचे कार्य पराक्रम आणि विचार आजही प्रेरणा दायी आहेत असे प्रतिपादन प्राचार्या डॉ .वेदश्री थिगळे यांनी केले त्या मविप्र दिंडोरी महाविद्यालयात आयोजित शिवजयंती प्रसंगी बोलत होत्या.

                 मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमासाठी व्यासपीठावर दुपार सत्र प्रमुख प्रा. एन के नवले सकाळ सत्र प्रमुख डॉ देविदास शिंदे प्रा.ए पी देशमुख,प्रा आर आर झोमन,डॉ जे.डी. पवार ,आर.के.जाधव हे उपस्थित होते,छत्रपती च्या कार्याला उजाळा देण्यासाठी एक ध्वनीचित्रफीत उपस्थिताना  दाखविण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा बलराम कांबळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा एस बी गांगोडे प्रा महेंद्र बागुल  यांच्यासह  प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.