ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी करावे अथक परिश्रम

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी करावे अथक परिश्रम

                 – मोनिका आथरे ( केतकी एक्सप्रेस)

 

 म वि प्र समाजाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय  व  राष्ट्रवादी काँग्रेस,  राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान दिंडोरी यांच्या संयुक्त  विद्यमाने मोनिका आथरे व मुग्धा  थोरात यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान

    एका छोट्या खेडेगावात जन्माला येऊन कुठेल्याही सोयीसुविधा नसताना  पिंपळगाव ते इंग्लंड हा प्रवास सोपा नव्हता.आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्यारेथॉन स्पर्धेत   ४२ किमी  धावणे तेही फक्त २ तास ३८ मिनिटात  अशक्य बाब आहे.  परंतु हे शक्य झाले ते फक्त जिद्द आणि मेहनत देशासाठी काहीतरी करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती यामुळेच म्हणून  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून ध्येय गाठावे  असे प्रतिपादन मोनिका आथरे  यांनी केले त्या म वि प्र च्या  दिंडोरी महाविद्यालयात  राजमाता जिजाऊ जयंती  निमित्त आयोजित नारीशक्ती पुरस्कार  सोहळ्याप्रसंगी  बोलत  होत्या . दुसऱ्या  सत्कारमूर्ती युवा लेखिका मुग्धा थोरात यांनीही आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊ यांचा जीवन आलेख उलगडला त्या म्हणाल्या  मी नववीत असताना गुणधुरंधर  या  छत्रपतींच्या जीवनावरील पुस्तक लेखनानंतर आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले . आज कुठल्याही व्यासपीठावर अभिव्यक्त होतांना कुठल्याही प्रकारची भीती नसते .  या सर्व युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

     मविप्र दिंडोरी महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने दिंडोरी महाविद्यालयात विवेकानंद व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला.  यानिमित्ताने नारीशक्ती पुरस्कार मोनिका आथरे ( केतकी एक्सप्रेस)  व युवा लेखिका मुग्धा थोरात यांना पोलीस उपनिरीक्षक सचिन नवलेअनिलदादा देशमुखप्राचार्या  डॉ वेदश्री थिगळे,  सर्व  जिजाऊ प्रतिष्ठान सदस्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  या प्रसंगी  महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ वेदश्री थिगळे  यांनी अध्यक्षीय मनोगतातुन विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले कि,

 विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऐतिहासिक साहित्याचे वाचन करून  ऐतिहासिक पात्रांचा   आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.   यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून  आपले करिअर घडविण्यासाठी आवाहन केले.  तसेच शिवव्याख्याते प्रकाश बर्डे  पाटील यांनी  साडे तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आपल्या व्याख्यानातून मांडला.  राष्ट्रमाता जिजाऊ या  माऊलीने शिवबा सारखा शूर योध्दा  आपल्या शिकवणीतून संस्कारातुन घडविला. एक तेजस्वी रत्न स्वराज्याला दिले .  अठरापगड जातीतील लोकांना सोबत घेऊन हे स्वराज्य उभ केलं याची मूळ प्रेरणा जिजाऊ आऊसाहेब होत्‍या म्हणून विचारांची उंची वाढून जबाबदारी पेलणारी  माणस ज्या  समाजात निर्माण होतात त्याच  समाजाचा विकास  अधिक होत असतो असे सांगितले.  प्रास्ताविक निलेश पेलमहाले  यांनी केले. सूत्रसंचालन प्रा बलराम कांबळे यांनी  तर आभार बापूसाहेब पाटील यांनी मानले . कार्यक्रम संयोजनासाठी अतुल  पठाडेमंगेश पवाररोशन कदमप्रतीक संधानराहुल निमसेरोशन अपसुंदे अजिंक्य शिंदेगणेश खांदे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर  कर्मचारी व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.