मविप्रच्या दिंडोरी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

मविप्रच्या दिंडोरी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात देखील शिक्षकाची भूमिका महत्त्वाची

 -मविप्र संचालक ,मा.दत्तात्रय पाटील                                                                  

    आजच्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शैक्षणिक प्रवासात अनेक अमुलाग्र बदल घडून आले. तरी  वेगवेगळ्या काळात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असल्याचं दिसून येते. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत जे  आमूलाग्र बदल झाले त्यानुसार अध्ययन व अध्यापनाच्या पद्धती बदलल्या. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी हे तंत्रज्ञान अवगत करून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे काळाची गरज आहे. त्यासाठीच अशा राष्ट्रीय स्तरावरच्या चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.त्याचप्रमाणे तंत्रज्ञान कितीही पुढारलेले असले परंतु ज्ञानदानाच्या कार्यासाठी शिक्षकांची गरज आहेच म्हणूनच आज  माहिती संप्रेषण तंत्रज्ञान युगातही शिक्षकाची भूमिका तितकीच महत्त्वाची  आहे असे प्रतिपादन मविप्र  दिंडोरी तालुका संचालक मा.  दत्तात्रय दादा  पाटील यांनी दिंडोरी येथील आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत असतांना केले.  शिक्षण पद्धतीतील बदल त्याचबरोबर तंत्रशिक्षण यामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं योगदान महत्त्वाच असल्याचं त्यांनी सांगितलं. पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर शिक्षणात गरजेचा आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर अशा चर्चासत्राच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन मिळणाऱ्या ज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

       बीओडी सावित्रीबाई फुले विद्यापीठ अनुदान आयोग व मविप्रचे दिंडोरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने USE OF ICT TOOLS IN TEACHING AND LEARNING या विषयावरील दोन दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी  संचालक मा.दत्तात्रय दादा पाटीलहेमंत पिंगळेसीएमसीएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  एस.  एन.  शिंदे,   डॉ. वेदश्री थिगळे  प्रा.  एस. जे. घोटेकर,  चर्चासत्राचे समन्वयक प्रा.  गांगोडे एस.  बी.प्रा. अजय निकमसकाळ सत्र प्रमुख  डॉ .देविदास  शिंदेप्रा. एन. के. नवले,प्रा. आर.  आर. झोमन,     आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

  यानंतर उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.  त्यामध्ये त्यांनी पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आजची  शिक्षण पद्धती यात झालेला अमुलाग्र बदल याविषयी बोलत असताना सांगितले की, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे वैश्विक पातळीवरचे ज्ञान क्षणभरात आपल्यापर्यंत पोहोचते. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही.  शिक्षण क्षेत्रात अध्ययनअध्यापन करीत असताना तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो हे समजून घेण्यासाठीच हे चर्चासत्र आयोजित केलेले आहे.त्यासाठी सर्वांनी  या चर्चासत्रात सहभागी होऊन विचार मंथन करावे असे सांगितले.

       चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात सीएमसीएस  महाविद्यालयाचे  प्राचार्य  डॉ.  एस.एन.शिंदे यांनी अध्ययन व अध्यापनातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा  विविध पद्धतीने होत असलेले उपयोग  पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या  माध्यमातून शिक्षणातील माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे महत्व सर्वांना पटवून दिले. यानंतर के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांनीही या विषयावर सखोल असं चिंतन प्रकट करत उपस्थितांना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा अध्ययनातील उपयोग कसा होतो हे पटवून देताना अनेक उदाहरणं व दाखले दिले.  तंत्रज्ञानाशिवाय आपलं कोणतेही काम होऊ शकत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.

 दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी भावनगरगुजरात येथील बुटालाल अजमेरा यांनी या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थितांशी चर्चा केली. त्याच बरोबर याच सत्रात सिल्वासा येथील डॉ.पवन अग्रवाल यांनीही तज्ञ मार्गदर्शक म्हणून या विषयासंदर्भात सखोल अशी माहिती देत चर्चा घडवून आणली. भोजनसत्रा नंतर बी. वाय. के.  महाविद्यालयाचे डॉ. कायंदे पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा बदलत्या काळाबरोबर कसा वापर करावा पारंपरिक शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात कसा करावा, याविषयी चर्चा केली.डॉ.मालती सानप यांनीही माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग याविषयी चर्चा  करून आपले विचार मांडले. चर्चासत्राच्या समारोप सत्रात प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी दोन दिवस झालेल्या चर्चासत्राचा  आढावा घेत गोषवारा मांडला . एकूणच चर्चासत्रात झालेल्या विचारमंथनातून प्रस्तुत विषयाला एक वेगळी दिशा प्राप्त झाल्याचे समाधान व्यक्त केले.यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात विविध महाविद्यालयातून आलेल्या सहभागी प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त करत चर्चासत्र विषयी आपले मत मांडले. प्रमाणपत्रांचे वाटप करून समारोप समारंभ संपन्न झाला.चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी चर्चासत्र समन्वयक प्रा.एस बी गांगोडेप्रा.अजय निकम व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तरकर्मचारी यांनी परिश्रम घेत संयोजन केले.चर्चासत्राच्या उदघाटन व समारोप सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बलराम कांबळे यांनी केले. चर्चासत्रासाठी विविध महाविद्यालयातून प्राध्यापक तथा विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते .