विद्यार्थ्यांनी स्वतःचा शोध घेत आयुष्यात ध्येय साध्य करावे
कवी लक्ष्मण महाडिक
भारत हा सगळ्यात अधिक युवांचा, तरुणांचा देश आहे. हा युवा शब्द जर उलटा केला तर वायू असा होतो. गती दिली तर त्याचे वादळ होते अशा प्रकारे विचारांचे वादळ घडविण्याचे काम विद्यार्थी करतात. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचा शोध घ्यावा आणि आयुष्यात ध्येय साध्य करावे असे आवाहन कवी लक्ष्मण महाडिक यांनी केले. ते मविप्रच्या दिंडोरी महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मविप्र संचालक श्री भाऊसाहेब खातळे, श्री. नानासाहेब महाले, श्री सचिन दादा पिंगळे यांच्यासह श्री. बाळासाहेब जाधव,श्री. अनिलदादा देशमुख, विलास नाना देशमुख, प्रशांत गावले, सीताराम जाधव, शिवाजीराव जाधव, मनोज ढिकले, गुलाब तात्या जाधव जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक बी जी पाटील पत्रकार संतोष कथार, बाळू जगताप, निलेश पिंगळे, पगारेसाहेब देशमुख साहेब, पवार साहेब महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ जे. डी पवार, प्रा .एन .के नवले प्रा ए .पी देशमुख,प्रा आर .आर झोमन शिक्षकेतर कर्मचारी आर के जाधव आदींसह सर्व विद्यार्थी प्रतिनिधी प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान लक्ष्मण महाडिक यांनी आपल्या कुणब्याची कविता या संग्रहातील सामाजिक वास्तव सांगणारी कविता ऐकवली.
मृत्यूनंतर सरकारी दप्तरी नोंद करताना
तलाठ्याला द्यावी लागते दक्षिणा
अन घालाव्या लागतात प्रदक्षिणा, सरकारी कचे ऱ्यात
यानंतर शेवटी कॉलेज मधल्या सर्व तरुणांसाठी एक लावणी देखील गायली .
कॉलेजमधल्या तरुणांची रोज राहते हवा
बाई पोरांचा टपून असतो थवा
या आणि अशा कितीतरी सामाजिक, राजकीय अशयांच्या कविता ऐकवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉक्टर वेदश्री थिगळे यांनी करून देत वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा घेत महाविद्यालयाच्या भावी उपक्रमाची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत मविप्र संचालक भाऊसाहेब खातळे यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला तसेच ते म्हणाले की ध्येय निश्चित करून कठोर परिश्रमाची तयारी ठेवा अपयश आलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. संकटांना न घाबरता आयुष्याची वाटचाल करा
यानंतर उपस्थित नाशिक तालुका संचालक सचिन दादा पिंगळे यांनी आपल्या भाषणातून तरुणाईच्या मनाचा वेध घेतला तसेच ते म्हणाले एखाद्या देशाचा राष्ट्रीय शिक्षणाचा दर्जा म्हणजे त्या देशाच्या विध्वंसाची सुरुवात होय . शिक्षणाचा दर्जा घसरला तर राष्ट्र कोसळते . त्यामुळे कर्मवीरांच्या या भूमीत हे होऊ न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण संचालक मंडळ व संस्था कटिबद्ध आहे.
यानंतर संचालक नाना महाले यांनीही गीत गायन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले या सर्व व्यासपीठावरील उपस्थितांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट कलाकार दडलेले आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच याप्रसंगी बाळासाहेब जाधव यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेणारा वार्षिक नियतकालिक दर्पण चे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर क्रीडा स्पर्धेसाठी विविध ठिकाणी सहभागी झालेले विद्यार्थी तसेच युवा सप्ताह निमित्ताने घेतलेल्या स्पर्धांच्या विजेत्या संघांना व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले व युवा सप्ताहानिमित्त झालेल्या काव्यवाचन, वकृत्वस्पर्धा, पुष्परचना, टाकाऊ पासून टिकाऊ, केशरचना, विविध व पारंपारिक पोशाख स्पर्धा यांमध्ये विजेत्यांचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा बलराम कांबळे यांनी केले. बक्षीस वितरणाचे वाचन दिनेश उकिर्डे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते