जागतिक महिला दिन
म वि प्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिंडोरी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संदर्भीय परिपत्रक क्रमांक रासेयो/२०१९-२०/५७१ नुसार जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी दिंडोरी तथा परिसरात आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेत स्वतःला सिद्ध केल आहे अशा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती बोरा मॅडम, श्रीमती वैशाली भाईटे, श्रीमती आळकुटे ( तलाठी, दिंडोरी व वनारवाडी) श्रीमती पूजा उपासनी (महाराष्ट्र बँक अधिकारी) या प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे या होत्या. त्याचबरोबर व्यासपीठावर डॉ. जे. डी. पवार, प्रा. श्रीमती. आर. पी . कोतवाल, प्रा. श्रीमती. बी. टी . ठाकरे,प्रा. श्रीमती. प्रियंका गारे, प्रा. श्रीमती. पी. एस कड,प्रा. श्रीमती. गायकवाड,प्रा. श्रीमती. एस .आर जाधव,
प्रा. श्रीमती. पटेल आर जे, प्रा. श्रीमती. एस .एम आवारे, श्रीमती. पी.बी आष्टेकर , श्रीमती. रोहिणी कोरडे , श्रीमती. केदारे एम. आर, श्रीमती. चौधरी यांचाही महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. न्यायाधीश बोरा मॅडम यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या, महिलांनी आपले हक्क व न्याय याप्रती सजग राहून जीवनात वाटचाल करावी असे आवाहन केले. यानंतर वैशाली भाईटे यांनी आपल्या मनोगतातून महिलां प्रती सामाजिक दृष्टिकोन बदल घडून आणण्यासाठी खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा करणे गरजेचे आहे, असे सांगितले . त्यानंतर श्रीमती पूजा उपासणी (महाराष्ट्र बँक अधिकारी) यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या हा दिवस महिलांचा गौरव दिवस असून आपण आपल्या आजूबाजूला पाहिल्यावर असे लक्षात येते की, महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या त्या क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध केले. म्हणूनच समाजाचा दृष्टीकोण सुधारावा आणि त्यांच्या प्रती विश्वास निर्माण व्हावा म्हणून महिला दिन साजरा केला जातो. तर श्रीमती आळकुटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यानंतर प्राचार्य डॉक्टर वेदश्री थिगळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून महिला दिनाचे महत्व सांगून ज्या महिलांनी आपल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी महिला दिनाच्या निमित्ताने मिळते असे प्रतिपादन केले
यानंतर ज्या महिलांनी अतिशय बिकट काळात सनातनी समाजाशी संघर्ष करून स्वतःला सुद्धा केले. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचे नाव प्रामुख्याने घ्याव लागेल. ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्री शिक्षणाला प्रेरणा दिली. त्यानंतर आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर यांनी देखील सनातनी काळात सगळ्या गोष्टींना विरोध असताना सगळा त्रास सहन करून डॉक्टर होण्याचा प्रवास पूर्ण केला. शैक्षणिक वारसा जोपासला, त्यासोबत शारदा कायद्याबद्दल ही माहिती दिली. कायदा हा महिलांच्या पाठीशी भक्कम उभा आहे त्यामुळे आपण मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता वाटचाल करावी असे आवाहन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बलराम कांबळे यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी प्रा संधान, प्रा. महाले प्रा. उकिर्डे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.