Student Notice_1 : केंद्र सरकारची महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण घेणार विद्यार्थ्यांकरीता सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना सण 2020-21

मराठा विद्या प्रसारक समाजाचे,

कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय दिंडोरी.

केंद्र सरकारची महाविद्यालयीन विद्यापीठीय शिक्षण घेणार विद्यार्थ्यांकरीता सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना सण 2020-21 करिता सूचना

दिनांक 15-9-2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता बारावी) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कला वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारची सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना उच्च शिक्षण संचालनालय पुणे, यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांचे नवीन शिष्यवृत्ती अर्ज व नूतनीकरण अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.(Top 20th Percentile merit list –www.dhepune.gov.in )  या संकेत स्थळावर मिरीट लिस्ट व मार्गदर्शक सूचना पाहाव्यात.

1) नवीन विद्यार्थ्यांनी (www.scholarship.gov.in) या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

2) नवीन मंजुरी अर्ज करण्यासाठी सदर विद्यार्थ्याचे नाव (www.scholarship.gov.in) या संकेतस्थळावरील केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या पात्रता यादी मध्ये सदर विद्यार्थ्यांचे नाव नमूद असलेले विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यां नवीन मंजुरी साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

3) ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी नवीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या बारावीच्या मार्कशीट प्रमाणे असलेल्या पूर्ण नावानुसार संपूर्ण नाव टाकून नोंदणी करावी आवश्यक माहिती भरल्याने विद्यार्थ्यांना टेम्पररी एप्लीकेशन आयडी प्राप्त  होईल. हा ID वापरून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावा सदर आयडी जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. सदरचा आयडी विद्यार्थ्यास अर्ज करण्यासाठी अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी उपयुक्त होणार आहे. पदवी, पदव्युत्तर व व्यवसायिक बिगर व्यवसायिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल

4) ऑनलाइन अर्ज भरताना विचारण्यात आलेली माहिती पूर्णपणे भरून ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी.

5) अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत असून अर्जाची हार्ड कॉपी व संबंधित कागदपत्रांसह महाविद्यालयात जमा करावी. नोटीस बोर्डवर परिपत्रक लावलेले आहे विद्यार्थ्यांनी परिपत्रक वाचावे.

किमान पात्रता अटी

1) अर्जदार भारतीय नागरिक व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2) अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती स्टायपेंडचा लाभार्थी नसावा.

3) अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख पेक्षा अधिक नसावे.

4) राष्ट्रीयकृत बँकेचा चा खाते नंबर मेजर असावा जॉइंट खाते नसावे.

5) आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न लिंक असावे.

 

 

(डॉ. वेदश्री थिगळे)

         प्राचार्य