नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त पराक्रम दिवस

 

 

 

 

 

 

मविप्र समाजाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त पराक्रम दिवस मोठ्या उत्साहात साजरा.      

       नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संदर्भीय परिपत्रक: रासेयो 2021 /157 नुसार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती महाविद्यालयात “पराक्रम दिवस” म्हणून करण्यात आली .

              याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळेअध्यक्षस्थानी होत्या तर रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.कल्पना काळदाते,प्रा के बी महाले प्रा. बलराम कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.     

         आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.वेदश्री थिगळे यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. जहाल मतवादाचा स्वीकार करून स्वातंत्र्यलढ्याला पोषक असे वातावरण निर्माण केले त्यांच्या या कार्याचे स्मरण आज आपण पराक्रम दिवस म्हणून साजरा करत आहोत असे महापुरुष आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या विचारांनी आपल्यामध्ये जिवंत आहेत त्यांचे विचार पुढच्या पिढीने जतन करावे यानंतर प्रा. के बी महाले यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन विषयी माहिती देत त्यांची देशभक्ती व केलेले पराक्रम  यांना उजाळा दिला  पराक्रम दिवसचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या दरम्यान प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम प्रसंगी सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक बलराम कांबळे यांनी केले कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमात covid-19 चे सर्व नियम पाळून कार्यक्रम साजरा करण्यात आला.