Library Rules

ग्रंथालय नियम

१.चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयीन वेळापत्रकानुसार २ पुस्तके घरी वाचण्यासाठी १० दिवसाच्या मुदतीकरता मिळू शकतात. १० दिवसानंतर रु. १ प्रती दिवस याप्रमाणे विलंब शुल्क दंड म्हणून आकारण्यात येईल.
२. ग्रंथालयातून वाचावयास घेतलेली पुस्तके काउंटर सोडण्यापूर्वी पाहून घ्यावीत. परत केलेली पुस्तके खराब झालेली,फाटलेली असल्यास विद्यार्थास त्याबद्दल पुस्तकाच्या किमतीच्या दीड पट रक्कम भरपाई द्यावी लागेल.
३. ग्रंथालयात येतांना नेहमी चालू शैक्षणिक वर्षाचे स्वतःचे ओळखपत्र सोबत असावे. ओळखपत्र ज्याचे त्यानेच वापरने आवश्यक आहे. ओळखपत्र हरवू नये. ओळखपत्र हरवल्यास ग्रंथपालांना लेखी कळवावे. नव्या ओळखपराकरिता फि रु ५०/- भरल्यावर नवीन ओळखपत्र दिले जाईल.
४. ग्रंथालयात प्रवेश करण्यापूर्वी रजिस्टर वर नोंद करणे बंधनकारक आहे.
५. विद्यार्थ्यास फक्त शैक्षणिक कामासाठी जास्तीत जास्त एक तास इंटरनेटचा वापर करता येईल.
६. ग्रंथालयाविषयी आपल्या काही सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात सूचना पेटी मध्ये टाकाव्यात.
७. ग्रंथालयात नेहमी शांतता राखावी. ग्रंथालयामध्ये बेशिस्त वर्णन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.