मराठा विद्या प्रसारक समाजाचे,
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिंडोरी
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०२०-२१
दिनांक २८/०८/२०२०
महाविद्यालयातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख , बौद्ध ,पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिक्षणाकरिता १०० टक्के केंद्रशासन पुरस्कृत ” अल्पसंख्यांक पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०२०-२१” च्या नवीन शिष्यवृत्ती व नूतनीकरणाचे शिष्यवृत्ती फॉर्म ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यासाठी www.scholarship.gov.in या संकेत स्थळावर मागविण्यात येत आहेत.
सदर शिष्यवृत्ती ११ वी, १२वी, पदवी, पदव्यत्तर डिग्री तसेच पोस्ट मॅट्रिक डिप्लोमा व सर्टिफिकेट पदवी या अभ्यासक्रमांसाठी देण्यात येते. केंद्रशासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर , २०२० अशी निर्धारित करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची पद्धत, संकेतस्थळ, तसेच इतर अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती मा. संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतःचा जो बँक खाते क्रमांक आधार सोबत लिंक असेल त्याच बँक खात्याची माहिती ऑनलाईन अर्जामध्ये भरावयाची आहे. शिष्यवृत्ती बँक खात्यावर विनाविलंब जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार बँक खात्याशी लिंक असणे अत्यावश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी https://resident.uidai.gov.in/bank-mapper या संकेतस्थळावर आपला आधार क्रमांक टाकून , सेक्युरिटी कोड एंटर करून सेंड ओटीपी वर क्लीक करावे आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून आपले आधार आणि बँक खाते क्रमांक लिंक स्टेटस चेक करून घ्यावे. आधार व बँक खाते लिंक नसल्यास नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये नवीन खाते उघडून आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यावे.
(डॉ.वेदश्री थिगळे)
प्राचार्या