रासेयो श्रमसंस्कार शिबिरातील दिवस हे आयुष्यातील अविस्मरणीय दिवस श्रीमती नीलिमा ताई पवार सरचिटणीस, मविप्र समाज
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाखांमधून सहा हजार विद्यार्थी रा.से.यो. सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिक मधील सर्व शासकीय कार्यक्रमातून सहभागी होऊन विशेष योगदान देतात .परंतु खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांवर संस्कार केले जातात ते केवळ विशेष श्रमसंस्कार शिबिरादरम्यान या सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते शिबीरामध्ये सहभागी विद्यार्थी घरापासून दूर राहून खूप वेगळा अनुभव घेत असतात साधारणपणे घरी असल्यावर त्यांना सगळ्या सुविधा मिळतात ,व्यवस्था असते परंतु येथे येऊन हातात टिकाव फावडे घेऊन काम करावे लागते श्रमाची किंमत येथे कळते एकूणच श्रमसंस्कार शिबिर आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतात. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस मा. श्रीमती नीलिमा ताई पवार यांनी केले मविप्र च्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिंडोरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना आयोजित युवा समर्थ भारत एक भारत श्रेष्ठ भारत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन प्रसंगी केले.विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिरात नुसत सहभागी न होता वृक्षारोपण ,शौचालय वापर ,ग्रामस्वच्छता अशा विविध उपक्रमांविषयी जनजागृती करावे असे आवाहन केले .यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,त्यातून राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी स्वीकारण्याची ताकद अशा शिबिरांमधून निर्माण होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिबिरातफक्त सहभागी न होता आलेल्या संधीचा फायदा घ्यावा मा. बाळासाहेब जाधव यांनीही प्रासंगिक शुभेच्छा दिल्या.यानंतर जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक बी .जी .पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शिबीरात करावयाचे कामे व त्यातून मिळणारा आनंद याबद्दल माहिती सांगून शुभेच्छा दिल्या यानंतर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष कथार यांनी वनारवाडी गावाबद्दल माहिती देऊन गावात संपूर्ण सहकार्य मिळेल याबद्दल शाश्वती दिली पुढे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नांदुरकर सर यांनीही अशा शिबिरांच्या माध्यमातून आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते असे सांगितले पुढे जि प शिक्षक जमधडे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जी प.शाळेच्या पूजा पताडे जी.प शाळेच्या विध्यार्थिनिनी स्वचछता विषयक मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मविप्र समाजाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 30 डिसेंबर 2019 ते दिनांक 5 जानेवारी 2020 या कालावधीत वनारवाडी येथे आयोजित करण्यात आले शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर मविप्र समाजाच्या सरचिटणीस मा.श्रीमती नीलिमा ताई पवार मा. मविप्र संचालक दत्तात्रय रामचंद्र पाटील माननीय अनिल दादा देशमुख,गुलाब तात्या जाधव,दत्तू नामदेव भेरे उपसरपंच वनारवाडी, बी जी पाटील मुख्याध्यापक ,जनता विद्यालय, दिंडोरी ,नांदुरकर सर मुख्याध्यापक जि प शाळा वनारवाडी ,अश्विनी रामदास पाटील ,ग्रामसेवक वनारवाडी भास्कर त्र्यंबक घोलप, अशोक मधुकर भेरे, भिमराज किसन वाघमारे, दीपक धुमणे ,अभिषेक कोंडरे ,छाया राजाराम राऊत, सरला शिवाजी डमाळे , शिवाजी रामभाऊ डमाळे,बापू दिलीप भेरे, संगीता तानाजी मोरे , सुनंदा घोलप ,अहिरे मॅडम प्रा.नवले , डॉ. देविदास शिंदे,डॉ जे. डी.पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बलराम कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ. कल्पना काळदाते यांनी केले, कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी के. बी. महाले व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन तथा जि.प. शाळा वनारवाडी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ वनारवाडी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
|
|