सेवा परमधर्म ही भावना लक्षात घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काम करावे

 सेवा परमधर्म ही भावना लक्षात घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काम करावे

                     माननीय संचालक दत्तात्रय दादा पाटील

            कर्मवीरांच्या आठवणी सतत  लक्षात ठेऊन  संस्थेशी  एकनिष्ठ राहून दैनंदिन जीवनात सेवा परमोधर्म ही भावना लक्षात घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना काम करावे असे आवाहन सन्मानीय संचालक दत्तात्रय दादा पाटील यांनी केले ते मानव विकास केंद्र नाशिक व मविप्र दिंडोरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे ते म्हणाले की सर्व कर्मचारी वर्गाने आपल्या कौशल्यांचा विकास घडवून आणावा कुणाशीही हेवेदावे न करता ऋणानुबंध जोपासावे . आपली शाळा ही आपली कर्मभूमी आहे म्हणून तर विद्यार्थी तुमच्या हातून घडतातआई वडिलांनंतर तुमचा विद्यार्थ्यांची संबंध येतो ही भावना लक्षात घेऊन काम करा असे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. एस के शिंदेप्राचार्य डॉ.  विलास देशमुखमानव संसाधन विकास केंद्राचे संचालक डॉ ए पी पाटीलमहाविद्यालयाच्या  प्राचार्या  डॉक्टर वेदश्री थिगळेयतीन पाटीलआर आर झोमनवरिष्ठ लिपिक आर के जाधवडी पी हळदे आदी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.  ए पी पाटील,  यांनी केले  त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश व  हेतू स्पष्ट केला.  सर्वांसाठी काही ना काही उपक्रम राबविले जातात.  परंतु त्याच्यासाठी  ट्रेनिंग किंवा  कुठल्याही प्रकारची कार्यशाळा होत नाहीम्हणूनच संस्थेच्या तालुकास्तरावरील या कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे.  चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आपण जे काम करतो त्यामध्ये आपल्याला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात त्यासाठी काहींना काही कौशल्य आत्मसात करावी लागतात.  तसेच आपले वर्तन विकास घडवून आणावा लागतो.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपला वर्तन विकास घडवून आणता येऊ शकतो त्याचं माध्यम म्हणजे अशा प्रकारची कार्यशाळा होय.  यानंतर प्राचार्या  डॉ.  वेदश्री थिगळे  यांनीही कार्यात्मक कौशल्य व वर्तन विकास अत्यंत महत्त्वाचे  आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या.

         उद्घाटन सत्रानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ.  एस के शिंदे यांनी  मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना अनेक उदाहरणे व दाखले देत मनोरंजनात्मक पद्धतीने उपस्थित चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करत अनेक मार्गदर्शक सूचना केल्या.  यानंतर पुढील सत्रात सोशल वर्कर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  विलास देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भोजन सत्रानंतर त्रंबकेश्वर महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ पी.व्ही  रसाळ यांनी कर्मचाऱ्यांचे  वर्तन याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार मांडत सर्व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.  शेवटच्या सत्रात  मानव संसाधन केंद्राचे संचालक डॉ.  ए पी पाटील यांनी  कौशल्यत्मक  विकासावर व वर्तन विषयक सखोल मार्गदर्शन केले.  शेवटच्या सत्रात प्रातिनिधिक स्वरूपात  सहभागाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र व इतर सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बलराम कांबळे यांनी केले.  कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले या कार्यशाळेसाठी संस्थेच्या विविध शाखांमधून चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.