माजी विद्यार्थ्यीनी जोपासावे महाविद्यलयाप्रती असलेले ऋणानुबंध

माजी  विद्यार्थ्यीनी जोपासावे महाविद्यलयाप्रती असलेले ऋणानुबंध

                                  प्राचार्या डॉ.वेदश्री थिगळे 

       माजी विद्यार्थी हे केवळ महाविद्यालयातून बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी  ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तृत्व संपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले असतात. ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकलेकरिअरचा विचार केलाज्या मातीनं तुम्हाला घडवलं अशा महाविद्यालयाप्रती तुमचे जे ऋणानुबंध आहे ते तुम्ही आयुष्य भर जोपासावे आणी वेळोवेळी महाविद्यालयाप्रती योगदान देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करावी असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले . महाविद्यालयाशी वेळोवेळी संपर्क करून माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय विकासात सक्रिय भूमिका पार पाडावी.  असे  आवाहन या प्रसंगी केले. तसेच काही माजी विद्यार्थी नोकरीत स्थिर झालेकुणाचा स्वतः चा व्यवसाय कुणाची नर्सरीफॅकट्री असल्याबाबत  प्राचार्यानी समाधान व्यक्त केले .

          मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिंडोरी या महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ए.पी देशमुख यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी  माजी विद्यार्थी मेळावा आयॊजना मागील उद्देश स्पष्ट केला.

यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतात माजी विद्यार्थी संस्था  अध्यक्ष  राहुल कडाळे  यांनी  माजी विद्यार्थी संस्थेची भूमिका सांगताना संस्था नोंदणीची  पार्श्वभूमी सांगून नोंदणी कामी घेतलेल्या  कामाचे उजळणी केली.  संस्थेच्या  भविष्यातील  यशस्वी वाटचालीस  सर्व सदस्यांकडून  सक्रिय सहयोगाची  अपेक्षा व्यक्त केली.  माजी विद्यार्थी  पूजा उफाडे  यांनी  प्रातिनिधिक स्वरूपात  मत व्यक्त करताना  महाविद्यालयात मिळालेले शिक्षण व संस्कार  भावी आयुष्यात  कसे उपयोगी पडत आहे  त्याबद्दल  अनुभव व्यक्त केले.  माजी विद्यार्थी संस्था सदस्य  अर्जुन श्रीवास्तव यांनी  महाविद्यालयाच्या  नवीन इमारतीचे  तसेच आधुनिक पायाभूत  सुविधेचे  कौतुक करून नव्याने शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी   मोठी संधी मविप्र संस्थेने उपलब्ध  करून दिली आहे  याबद्दल समाधान व्यक्त केले.   तसेच महाविद्यालयाच्या  विकासासाठी  माजी विद्यार्थी संस्था  कटिबद्ध असून  सर्व माजी विद्यार्थ्यांकडून  सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. काही माजी विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची जबाबदारीही स्वीकारली. मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी संस्थे संबंधित अनेक ठराव मांडून सर्वानुमते संमत करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयास शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बलराम कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एस.बी.गांगोडेप्रा. के.बी. महाले व इतर प्राध्यापक प्राध्यापकेत्तर  कर्मचारी  यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.