दिंडोरी महाविद्यालया मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा

दिंडोरी महाविद्यालया मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा

 मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाशिकचे भूषण कवी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे मॅडम होत्या.व्यासपीठावर दुपार सत्र प्रमुख प्रा नवले सरसकाळ सत्र प्रमुख डॉ शिंदे सर,प्रा देशमुख सर,डॉ पवार मॅडम,प्रा कांबळे सर,प्रा निकम सर,उपस्थित होते.

           कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात  आले

            अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ वेदश्री थिगळे मॅडम म्हणाल्या सूर्याची तेजस्विता,चंद्राची शीतलता,अवकाशाची विशालतापृथ्वीची सर्जनता,सागराची अथांगता,सरिताची सात्विकता,वायुची गतीशिलता,जलाची समृद्धता,अग्निची प्रखरता,फुलाची कोमलता,मधाची मधुरता,आईची ममता असणारी जगातील एकमेव भाषा म्हणजे आपली अमृताशी पैजा जिंकणारी मायमराठी. मायबोलीची परवड व तिचा कोंडत चाललेला श्वास,भविष्य अंधकारमय करेल म्हणून वेळीच तिचे संगोपन व संवर्धन करणे काळाची गरज आहे. जर आपल्याला भारतात,जगात मराठीला मान सन्मान मिळवून दयायचा असेल तर इतर भाषांचाही आपण आदर केला पाहिजे. मराठी भाषेला समृद्ध करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.प्रशासनानाच्या वतीने विद्यार्थ्यांना मराठी भाषा रोज व्यवहारात बोलण्याविषयी शपथ दिली.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कांबळे सर यांनी केले तर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मराठी विषय शिकविणा-या शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.