मविप्रच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दिंडोरी येथे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी, प्रमुख अतिथी म्हणून मा. न्यायाधीश श्रीमती एस. जी. बोरा या उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. बी. के चौरे (पदाधिकारी , तालुका विधी सेवा समिती दिंडोरी ) हे होते. व्यसपीठावर मा. व्ही. आर. उगले , मा. जगदीश घुमरे मा. श्रीमती शीतल पाटील, मा. श्री. विजय शिंदे, मा. श्री विजय घोरपडे यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ.वेदश्री थिगळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहन संपन्न झाले . व संविधानाच्या प्रस्ताविकाचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले. यानंतर कायदेविषयक शिबिराचे उदघाटन सर्व मान्यवरांचे हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजन व संविधानाचे पूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ.वेदश्री थिगळे यांनी केले त्यांनी संविधान दिन आयोजनाचा उद्देश्य आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते मा. श्री. बी. के चौरे (पदाधिकारी , तालुका विधी सेवा समिती दिंडोरी ) हे होते. यांनी संविधाविषयी माहिती देताना सांगितले कि , संविधान हे परीक्षेपुरते मार्क्स मिळविण्यासाठी वाचू नये तर आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा उपयॊग होण्यासाठी रोज नित्याने संविधानाचे वाचन करावे . तसेच संविधानाविषयी महत्वपूर्ण अशी माहिती दिली.
अध्यक्ष मा. न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधला . महाविद्यालयातून संविधान वाचनामुळे विद्यार्थ्यांची मने सुसंस्कारित होतील. संविधानातुन आपल्याला अधिकार, कर्तव्य,हक्क आदींची माहिती होते.
यानंतर प्रमुख अतिथी म्हणून मा. न्यायाधीश श्रीमती एस. जी. बोरा यांनी घटनेची पाच विभागात विभागणी कशी केली आहे. याचे सविस्तर विवेचन केले. आपली घटना जगातील उत्कृष्ट संविधान आहे. असे सांगितले .
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,प्राध्यापकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.