मविप्र युवास्पंदनमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालं हक्काचं व्यासपीठ
– मा. श्री. दत्तात्रय दादा पाटील (संचालक, मविप्र समाज संस्था, दिंडोरी तालुका )
मविप्र संस्थेअंतंर्गत असलेल्या विविध महाविद्यालयासाठी मविप्र युवा स्पंदन हा उपक्रम संस्थेने सहा वर्षांपासून सातत्याने राबविलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाबरोबरच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे . त्यामुळे उद्याचे उत्तम कलाकार आपल्याला मिळणार आहे असे प्रतिपादन मा.संचालक श्री. दत्तात्रय दादा पाटील सो. यांनी केले. ते मविप्र दिंडोरी महाविद्यालयात आयोजित मविप्र युवा स्पंदन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मा.डॉ. संदीप आहेर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, जिथे बुद्धी आणि प्रतिभा यांचा संगम होतो तिथे कलाकृतीचा जन्म होतो आणि त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकासही होतो. अशा कलाकृती सादर करण्याचे युवा स्पंदन हे व्यासपीठ आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील कलेचे प्रयोजन करून तिचा विकास करणे गरजेचे आहे.
सदर कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ दि. १२ डिसें. २०१९ रोजी पार पडला. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. संजय सानप यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, कला माणसाला जगायला शिकवतात, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात.प्राथमिक फेरीच्या द्वितीय दिवशी प्रा. आर. के. मुंगसे (मविप्र, सांस्कृतिक अधिकारी )प्रा. तुषार पाटील (मविप्र, युवा स्पंदन जिल्हा समन्व्यक ) यांनी सदिच्छा भेट दिली व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .
सदर स्पर्धेत मविप्रच्या दिंडोरी वरिष्ठ महाविद्यालयास समूह गीत, लाइट व्होकल,एकांकिका, मिमिक्री,मूकाभिनय (माइम)यात प्रथम क्रमांक, कनिष्ठ जनता महाविद्यालय दिंडोरी क्लासिकल ताल यात प्रथम क्रमांक, अध्यापक महाविद्यालय दिंडोरी क्लासिकल स्वर यात प्रथम क्रमांक, वरिष्ठ वणी महाविद्यालय वेस्टर्न सोलो,फोक आर्केस्ट्रा, स्किट,फोक डांन्स यात प्रथम क्रमांक कनिष्ठ खेडगाव महाविद्यालयास क्लासिकल डान्स यात प्रथम क्रमांक मिळाला या सर्व तालुकास्तरीय विजेत्या स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे
कार्यक्रमासाठी समन्व्यक म्हणून डॉ.जे.डी .पवार ,डॉ.डी .एन शिंदे प्रा .आर .आर. झोमन यांनी काम पाहिले सदर कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून श्रीमती माधवी भोसले व श्रीमती कांचन गोसावी ह्या होत्या. सूत्रसंचालन प्राध्यापक बलराम कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. दिनेश उकिरडे यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील सहभागी स्पर्धक,संघ प्रमुख,तसेच महाविद्यालयातील प्राध्यपक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.